चालू उपक्रम

गावामध्ये चालू व पूर्ण झालेले उपक्रम

वैयक्तिक शौचालय सुविधा व वापर

कुटुंबांसाठी बांधण्यात आलेले शौचालय 4 भिंती, दरवाजा व छतासह पूर्णपणे बांधकाम केलेले आहे. तसेच शौचालयासोबत वापरासाठी पाण्याची व हात धुण्याची सुविधा आहे.

सार्वजनिक शौचालय सुविधा

सार्वजनिक शौचालये हा स्वच्छ भारत मिशन अंतर्गत एक घटक आहे. योग्य संख्येत शौचालये, स्नानगृहे, कपडे धुण्यासाठीच्या जागा आणि सहज वापरता येतील अशा जागी उभारली आहे.

पाणी गुणवत्ता तपासणी

पाणी गुणवत्ता तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र खानापूर अंतर्गत देविखिंडी गावामध्ये वेळो-वेळी पाणी गुणवत्ता तपासणी केली असता एकदाही लाल कार्ड मिळाले नाही.

सांडपाणी व्यवस्थापन

सांडपाण्याचे व्यवस्थापन म्हणजे सार्वजनिक आरोग्य, आर्थिक, सामाजिक आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी तसेच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सांडपाणी हाताळणे वरील सर्व उपक्रम गावामध्ये राबवले आहेत.

घन कचरा व्यवस्थापन

घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनांतर्गत कंपोस्ट खड्डे, गांडूळ खत निर्मिती, कुटुंबांकडील कचरा गोळा करणे, वेगळा करणे त्याचा पुर्नवापर व विक्री आणि त्यांचे व्यवस्थापन करणे इत्यादी उपक्रम गावामध्ये राबवले आहेत.

शोष खड्ड्यांचे बांधकाम

शोष खड्ड्यांचे बांधकाम वीटांची वर्तुळाकार रचना करून केली आहे, मुखात सांड पाण्याची विल्लेवाट लावण्यासाठी शोष खड्ड्यांचा प्रकल्प राबण्यात आला आहे व यात कोणतीही तांत्रिक अडचणी येणार नाहीत याची काळजी घेतली आहे.

मनोगत

गावातील लोकांचे संक्षिप्त मनोगत

© Devikhindi Grampanchayat. All Rights Reserved.

Designed by RK Enterprises | Pune