देविखिंडी गावचा इतिहास


भौगोलिक माहिती

देविखिंडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील खानापुर तालुका मधील एक गांव आहे. सदर गांव विटा या ठिकाणापासून २१ कि. मी. अंतरावर आहे. तसेच तालुका खानापूर या ठिकाणापासून २२ कि. मी. अंतरावर आहे. सांगली जिल्ह्याच्या मुख्यालयापासून सुमारे ७६ कि. मी. अंतरावर गांव आहे.

गावचा इतिहास

देविखिंडी हे गांव सांगली जिल्ह्याचे शेवटचे टोक म्हणून पहिले जाते हे गांव विटा पासून २१ किमी अंतरावर डोंगर कपारीत वसलेले आहे. सांगली आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यांना तसेच खानापूर ,आटपाडी , आणि खटाव या ३ तालुक्यांना जोडणारे गाव आहे. सदर गावाच्या सभोवताली डोंगर दर्या असून त्या डोंगराच्या प्रत्येक खिंडीमध्ये वेगवेगळया देवांची मंदिरे आहेत.तसेच प्रत्येक खिंडीला वेगवेगळी नावे आहेत (महादेव खोरी,परभतलिंग, वाघजाईदरा ,नागोरदरा, बामणदरा, वाडीचीखोरी, देवजाईदरा,) गावाच्या पूर्वेस देवजाई मंदिर आहे या देवीच्या नावावरून गावास देविखिंडी हे नाव पडलेले असून त्या गावाच्या पूर्वेस ३ कि.मी. डोंगराच्या पटरावरती प्रसिद्धअसे सिद्धनाथ मंदिर आहे. पश्चिमेस २ किमी अंतरावर उंच डोंगरावरती दावणमलिक बाबा दर्गा आहे. सदर दर्गा सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध दर्गा आहे. दक्षिणेस टेंभू योजनेचा ७.५ किमी अंतराचा ९० फुट खोलीचा कॅनॉल व १९० बंदिस्त बोगदा या गावातून गेला आहे त्यातून मिळणाऱ्या पाण्याचा फायदा खानापूर,आटपाडी,सांगोले तालुक्यातील शेतकर्यांना खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे .तसेच या गावात सार्वजनिक यात्रा मोहत्सव सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन साजरे केले जातात (उदा:- (चैत्र महिन्यात) सासन काठी व हनुमान जयंती यात्रा ,(आषाडी) महिन्यात मरीमी यात्रा, (भाद्र्पद)महिन्यात देवजाई यात्रा, (फाल्गुन) महिन्यात गावाचा पिराचा उरूस यात्रा )

गावची ठळक वैशिष्ठे

गावातील व शाळेतील मुले /मुली प्रत्येक क्षेत्रात अवगत आहेत (२ कीर्तनकार एक बाल व एक युवा , हिंदकेसरी कुस्ती सुवर्ण पदक विजेता, सिनेमा कलाकार व बिग बॉस विजेता , किक बॉक्सिंग सुवर्ण पदक विजेती , कराटे कास्यपदक विजेता , भाला फेक १०० /८०० मीटर धावणे , लांब आणि उंच उडी विजेते

स्वच्छ पाणीपुरवठा
अखंडितवीजपुरवठा
वैदकीयसुविधा
आदर्शशाळा

© Devikhindi Grampanchayat. All Rights Reserved.

Designed by RK Enterprises | Pune