देविखिंडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील खानापुर तालुका मधील एक गांव आहे. सदर गांव विटा या ठिकाणापासून २१ कि. मी. अंतरावर आहे. तसेच तालुका खानापूर या ठिकाणापासून २२ कि. मी. अंतरावर आहे. सांगली जिल्ह्याच्या मुख्यालयापासून सुमारे ७६ कि. मी. अंतरावर गांव आहे.
गावातील व शाळेतील मुले /मुली प्रत्येक क्षेत्रात अवगत आहेत (२ कीर्तनकार एक बाल व एक युवा , हिंदकेसरी कुस्ती सुवर्ण पदक विजेता, सिनेमा कलाकार व बिग बॉस विजेता , किक बॉक्सिंग सुवर्ण पदक विजेती , कराटे कास्यपदक विजेता , भाला फेक १०० /८०० मीटर धावणे , लांब आणि उंच उडी विजेते
मौजे देविखिंडी या गावाने शासनाच्या “माझी वसुंधरा अभियान”या योजनेत सहभाग घेतला असून देविखिंडी हे गाव संपूर्णपणे हरित करणेच्या दृष्टीने विविध योजना व उपक्रम आयोजित केले आहेत. मौजे देविखिंडी मध्ये गावातील नागरिकांना माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करणेसंबंधी गावातील सर्व लोकांना गावामध्ये झाडे लावणे माहिती दिली. तसेच पर्यावरणाचे संगोपन व संवर्धन करणेसंबंधी जनजागृती कार्यक्रम आयोजित करून त्याचे फेसबुक व Whatsapp पोस्ट द्वारे विविध पर्यावरण संरक्षणाचे उपक्रम राबविले.
ग्रामपंचायत देविखिंडी
ता. खानापूर जि. सांगली पिन – ४१५३०९
contact@devikhindi.com
+91 9665306208
+91 9922969444
© Devikhindi Grampanchayat. All Rights Reserved.
Designed by RK Enterprises | Pune